आजचे राशीभविष्य, ३० मार्च २०२६

मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही.

त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ संभवतात. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन: आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी – पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील.

Tata motars punch

कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. अवैध प्रवृत्तीकडे झुकणार्‍या मनाला काबूत ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अपेक्षित सफलता मिळणार नाही.

सिंह: आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप व वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवावे. दांपत्य जीवनात माधुर्य राहील.

कन्या: आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. मांगलिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कोर्ट-कचेरी व नोकरांपासून जपून राहावे लागेल.

तूळ: आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा-समाधानाचा अनुभव येईल. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

वृश्चिक: आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी – व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी व वडीलधार्‍यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. संततीकडून समाधान मिळेल. मान – प्रतिष्ठा वाढेल.

धनु: आज आपणाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी-व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी व विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नये.

मकर: आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर नियंत्रण ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ: आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास काम यशस्वी करील. कुटुंबात सुख – शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 30-03-2026