खेड : तालुक्यातील खारी येथील प्रवीण अनंत बहुतुले (वय ३७) हे २६ डिसेंबरच्या पहाटे ३.३० वाजता पाण्यात बुडून गायब झाले होते. त्यांचा मृतदेह २८ डिसेंबरच्या पहाटे सापडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रविन बहुतुले हे येथे पाण्यात पडले होते. त्यांचा मृत्यू प्राथमिक अंदाजानुसार पाण्यात बुडून झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे खारी गावात शोककळा पसरली आहे. प्रवीण बहुतुले यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 30/Dec/2024












