मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी तिसऱ्या सत्रातील खेळात जबरदस्त कमबॅक करत ऑस्ट्रेलियन संघानं हातून निसटणारा सामना जिंकला. भारतीय संघानं या सत्रात ७ विकेट्स गमावल्या.
परिणामी संघाला १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्नच्या मैदानातील पराभवानंतर रोहित शर्मानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने हा पराभव मानसिकरित्या त्रासदायक आणि धक्का देणारा आहे, असे त्याने म्हटले आहे.
पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीतील पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, मी जिथं होतो तिथंच आहे. एक कर्णधार अन् आणि फलंदाजाच्या रुपात काही गोष्टी आमच्या बाजूनं अनुकूल ठरल्या नाहीत. हे निराशजनक आहे. ही गोष्ट मानसिकरित्याही त्रासदायक आणि धक्का देणारी आहे. एका टीमच्या रुपात काही गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे., असेही त्याने म्हटले आहे.
संधी निर्माण केल्या, पण त्याचा फायदा उठवता आला नाही
आम्ही जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. मैदानात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवीरित्या ते प्रयत्न कमी पडले. दोन सत्रात खेळ बिघडला, असे म्हणता येणार नाही. या सामन्यात आम्ही अनेकदा संधी निर्माण केली. पण त्याचा फायदा उठवता आला नाही, असे सांगताना त्याने ऑस्ट्रेलियन संघानं ९० धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या, याचा उल्लेखही केला.
कदाचित हेच पराभवामागचं कारण…
या सामन्यात सुरुवातीच्या काळात संघाची अवस्था बिकटच होती. कठीण परिस्थितीत आम्ही जोर लावून खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी (ऑस्ट्रेलियानं) चांगली टक्कर दिली. विशेषत: दुसऱ्या डावात १० व्या आणि ११ व्या क्रमांकावरील फलंदाजांनी जी भागीदारी केली ती पराभवामागचं कारण ठरली. इथंच आम्ही मागे पडलो, असेही रोहित शर्मानं बोलून दाखवले. नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी केलेल्या तगड्या भागीदारीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर ३४० धावांचे तगटे आव्हान ठेवले होते. चौथ्या डावात ३४० धावांचा पाठलाग करणं सोप नव्हते. पण दोन सत्रात प्लॅटफॉर्म सेट करून हा पल्ला गाठण्याच्या इराद्यानेच आम्ही खेळलो. पण प्रतिस्पर्धी संघानं सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि आम्ही मागे पडलो, असे तो म्हणाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 30-12-2024