रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून पावस आणि लिंबूवाडी येथे 21 डिसेंबर रोजी आशासेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण भागातील जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या आशा सेविका याना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत मार्गदर्शन करून त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचून त्याचा लाभ सामान्य जनतेला होत असतो. या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाडिलिंबू येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक शरद कामत, सीएचओ सुप्रिया सुर्वे, गटप्रवर्तक प्राची लोटणकर, पर्यवेक्षक डी. व्ही. गुरव, श्री. रेवाळे, आरोग्य कर्मचारी शुभम कांबळे हे उपस्थित होते. तर पावस येथे डॉ. एम. एम. चव्हाण, गटप्रवर्तक एस. टी. सामंत, एलएचव्ही एस. एस. यादव, पर्यवेक्षक बी. पी. दराडे, एस. व्ही. जाधव, ए. एस. कांदगावकर उपस्थित होते. तर धन्वंतरी रुग्णालयाकडून श्वेता कदम, ऐश्वर्या सिस्टर, रुशिका सिस्टर यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 30-12-2024