दापोली : जोडून आलेल्या सुट्यांमुळे गेले आठवडाभर दापोलीत पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. दोन दिवसात सरासरी ५० हजारहून अधिक पर्यटकांनी दापोलीच्या बीच पर्यटनाचा आनंद घेतला. चारचाकी खासगी वाहने घेऊन येणाऱ्यां पर्यटकांची गर्दी अधिक असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दरवर्षी नाताळ सुट्टीसह नववर्ष स्वागताला दापोलीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. वाहनाचा वाढता ओघ आणि पर्यटन ठिकाणी जाणारे अरुंद रस्ते त्यात रस्त्यांची उडालेली दैना यामुळे अनेकवेळा गर्दीत अडकून रहावे लागते. दापोली, मुरुड, कर्दे, पाळंदे, हर्णे आदी बीच पर्यटकांनी हाऊसफुल आहेत. मात्र, इथले खराब रस्ते वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. दापोली मुरुड पर्यटनक्षेत्रात जाणारा रस्ता अति खराब असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 31/Dec/2024














