रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी जरून जिल्ह्यात यावे. सुट्टी आनंदात घालवावी; परंतु सुरक्षादेखील महत्वाची आहे. त्यासाठी समुद्रकिनारी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. समुद्रात उतरताना आततायीपणा करू नका. पाण्याचा अंदाज, माहिती घेऊनच उतरा तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी सुरू आहे. चालकाची ब्रिथ अॅनालायझरद्वारे तपासणी होत आहे. दारू पिणाऱ्यावर कठोर करवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटकांना दिला आहे.
जिल्ह्यात नाताळच्या सुट्टीबरोबर २०२४ या वर्षाला गुडबाय करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी आहे. राज्यातून येणाऱ्या अनेक पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. पाण्याचा अंदाज न घेता आततायीपणा करत पाण्यात उतरतात आणि दुर्घटना घडतात तसेच ३१ डिसेंबरला होणाऱ्या पार्ट्यामुळे मोठ्या प्रमाणातमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे अपघात घडल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटनाचा निखळ आनंद मिळण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासन त्यांचे स्वागत करण्यासाठी तपार आहे; परंतु कोणताही अनुचित प्रकार पडू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. अतिउत्साह आणि आततायीपणामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. त्यासाठी सागर सुरक्षारक्षक, मच्छीमार, गावकर आदींची मदत घेतली आहे तसेच ध्वनिक्षेपकावरून सूचना करण्यात येत आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पार्ट्यामुळे अनेक वाहनचालक मद्य प्राशन करून वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 31/Dec/2024













