साखरपा : सरत्या वर्षाला अनेकजण आपापल्या पद्धतीने निरोप देत असतात; पण कलाकारांनी दिलेला निरोप हा त्यांच्या कलेच्या माध्यमातून रांगोळीकार विलास रहाटे यांनीही आपल्या कलेतून २०२४ वर्षाला असाच निरोप दिला आहे.
देवरूख येथील २०२४ हे वर्ष अनेक दिगजांच्या निधनाने लक्षात राहिले. रामपूर सहस्वान घराण्याचे गायक रशीद खाँ, सारंगी वादक आणि पद्मपुरस्काराने सन्मानित कलाकार राम नारायण, तबल्याची आख्यायिका होऊन राहिलेले पद्मविभूषण झाकीर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि नीतीमत्ता जपत आपल्या व्यवसायातून देशाचे नाव जगात उज्वल करणारे उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. या सगळ्यांना आपल्या कलेतून आदरांजली वाहण्याचा विचार रांगोळीकार विलास रहाटे यांना सुचला आणि त्यांनी तो अंमलातही आणला.

रहाटे हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या टीमला मार्गदर्शन करत आहेत. सध्या हा संघ झोनल स्पर्धाची तयारी करत आहे. त्या निमित्त रहाटे मुंबईत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या आवारात या रांगोळ्या साकारल्या आहेत. या दिग्गजांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांनी रांगोळ्या साकारल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 01/Jan/2025










