ऑनलाईन लग्न जमविताना होऊ शकते फसवणूक

◼️ प्रत्यक्ष माहिती मिळवूनच निर्णय घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे इच्छुक वधू-वरांच्या पालकांनीही खबरदारी घ्यावी, असा सल्ला पोलिस विभागाकडून दिला जात आहे. संकेतस्थळावरून लग्न जमविताना आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर लग्न जमवूनही मुली किंवा मुलांची फसवणूक केली जात असल्याच्या घटनाही वाढत आहेत. विवाह जमविणाऱ्या संकेतस्थळावरूनही खोटी माहिती देऊन लग्न जमविली जातात. मात्र, त्यातून आर्थिक फसवणूकही होत आहे. अनेकजण हतबल झाले आहेत. खेड तालुक्यात गेल्यावर्षी संकेतस्थळावर मुलीने खोटी प्रोफाइल बनवून मुलाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस दलाने शिताफीने तो प्रकार उघड केला. या प्रकरणात या शक्यताही लक्षात घ्या संकेतस्थळावर नोंदणी करणारे फसवेही असू शकतात. काही ठिकाणी अगदी बोलणी करण्यासाठी आले आणि घर बघून गेल्यानंतर चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही लग्न ठरल्यानंतर येणे-जाणे वाढवितात.

मुलीसोबत फिरून सगळी माहिती करून घेतात. त्यानंतर संधी मिळाल्यावर घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारतात. ऑनलाइन वधू-वर शोधताना त्यांच्या पालकांनी त्यांचे प्रोफाइल खरे आहे का, याची खात्री पहिल्यांदा करून घ्यायला हवी. ती माहिती विश्वासार्ह असली, तरीही प्रत्यक्ष त्या स्थळाची माहिती मिळवायला हवी. ती खरी असेल, तरच लग्न जुळवावे. लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून काही वेळा फेक प्रोफाइलही पाठविले जाते. त्यामुळे संकेतस्थळावरून वधू-वर शोधताना प्रत्यक्ष माहिती मिळवून त्यांचे प्रोफाइल खरे आहे का, याची माहितीही घ्यायला हवी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 01-01-2025