रत्नागिरी : साखरवाडी-आंबेरकोनी (ता. राजापूर) येथील महिलेने विषारी द्रव प्यायल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुंजी राजेंद्र देवळेकर (वय ३१, रा. साखरवाडी, आंबेरकोनी, ता. राजापूर) असे त्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुंजी देवळेकर यांनी विषारी द्रव्य पिले. अस्वस्थ वाटू लागल्याने राजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.














