राजापूर : विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : साखरवाडी-आंबेरकोनी (ता. राजापूर) येथील महिलेने विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. रुंजी राजेंद्र देवळेकर (वय ३१, रा. साखरवाडी, आंबेरकोनी, ता. राजापूर) असे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१) सकाळी सहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुंजी देवळेकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांना तात्काळ राजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी सकाळी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 03/Jan/2025