जिल्हा ग्रंथालय संघाचे गुहागरात अधिवेशन

गुहागर : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन दि. १८ व १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गुहागरात होणार आहे.

ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर यांच्या विद्यमाने श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, श्रीपूजा कृषी पर्यटन केंद्र, खातू मसाले उद्योगासमोर, पाटन्हाळे येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

डॉ. श्री गजानन कोटेवार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी सर्व ग्रंथालय प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 06/Jan/2025