दोन मुलांकडून रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड..

दापोली : जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे यावर वेळीच पडदा पडला. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

सोमवारी (ता. ६) रात्री दोन मुलांकडून रस्त्याने जाणाऱ्या मुलीला थांबवून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पीडित मुलीने आरडा ओरड केल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली. या प्रकरणामुळे परिसरातील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीहुन तातडीने राखीव दलाचे सुमारे ३० पोलिसांच्या तुकडीला बोलविण्यात आले. यामधील छेडछाड करणारा हा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 08-01-2025