Gold Silver Rate: सोने अन् चांदीचे दर घसरले !

Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली. स्थानिक सराफा बाजारातून सोने खरेदीची चांगली संधी आहे. सोन्याच्या फेब्रुवारीच्या वायद्यात घसरण पाहायला मिळाली.

एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 81 रुपयांची घसरण झाली. इथं 10 ग्रॅम सोन्याचा दर 77450 रुपये इतका आहे. इथं 77500 रुपयांनी दर घसरले आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 77402 रुपयांपर्यंत घसरण झाली होती तर 77524 पर्यंत पोहोचले होते.

एमसीएक्सवर चांदीच्या दरात 162 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा दर 90711 रुपये आहे. चांदीचे हे दर मार्चच्या वायद्याचे आहेत. एमसीक्सवर एक किलो चांदीचा दर 90665 ते 90889 रुपयांदरम्यान होता.

नवी दिल्ली, चंदीगड, लखनौ आणि जयपूर या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 78970 रुपये आहे. तर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, आणि नागपूरमध्ये सोन्याचा दर 78820 रुपये इतका आहे. अहमदाबाद, पाटणा या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 78870 रुपये इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली. कॉमेक्सवर फेब्रुवारीच्या वायद्याच्या सोने दरात 5.26 डॉलरची घसरण झाली. तिथ 2260.14 डॉलर प्रति औन्स सोनं मिळत आहे. चांदीच्या मार्चच्या वायदेबाजारात देखील घसरण पाहायला मिळाली.

(टीप : विविध शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे असू शकतात.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 08-01-2025