चिपळुणात ६६ कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६६ कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे. यातील किती शिक्षक हजर होतात त्यानुसार त्यांची शाळांवर नियुक्ती केली जाणार आहे.

राज्यातील दोन जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतांवर स्थगितीची टांगती तलवार होती; मात्र शासनाकडून प्रक्रिया स्थगितीचे कोणतेही आदेश न आल्यामुळे सोमवारी ३८६ शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील ६६ शिक्षकांचा समावेश आहे.

यापूर्वी १०५ जणांना नियुक्ती दिली गेली होती. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे ११०० पैकी ४० टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागामधून तक्रारीचे सूर उमटत होते. राजकीय पक्षांनीही आंदोलनाना इशारा देत सत्ताधाऱ्यांनी अडचण केली होती. त्यामुळे लोकसमा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये सुरू झाली.

काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती थांबली. या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले, त्याचा परिणाम याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीन रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरवात केली.

कंत्राटी शिक्षक भरले गेल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. यासाठी गावावील बीएड, बीएड्‌धारक तरुणांची निवड केली गेली आहे, तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही सुटला आहे. ६६ पैकी किती कंत्राटी शिक्षक हजर होतात हे पाहावे लागणार आहे. जिथे प्राधान्याने शिक्षकाची गरज आहे तरुणांना रोजगार मिळाला आहे. यासाठी त्या ठिकाणी प्रथम नेमणूक केली जाईल – दादासाहेब इरनाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 08/Jan/2025