बॉलिवूडमध्ये यायची एवढी घाई का? सेटवर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी रवीना टंडनची लेक ट्रोल

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘आझाद’ या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवतंय.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांमध्ये राशाने चांगलीच छाप सोडली आहे. तिचं पहिलं गाणंसुद्धा सोशल मीडियावर तुफान हिट होतंय. राशाचा डान्स आणि तिचे हावभाव पाहून ती सर्व स्टारकिड्सना तगडी टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच राशाचा एक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे शूटसाठी राशाचं मेकअप सुरू आहे, तर दुसरीकडे ती समोर पुस्तक ठेवून अभ्यास करताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एकीकडे राशा तिच्या शूटिंगसाठी तयार होत आहे, तर दुसरीकडे ती बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठीही तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट राशाला सीनसाठी तयार करत आहेत. त्याचवेळी शूटिंगच्या कपड्यांमध्ये आरशासमोर बसलेली राशा लक्ष केंद्रीत करून अभ्यास करताना दिसतेय. जी व्यक्ती तिचा व्हिडीओ शूट करते, तिच तिला विचारते की, ‘राशा तू शूटिंगसाठी तयार आहेस का? तू हे काय करतेय?’ तेव्हा राशा हळूच कॅमेरात बघून हसते आणि सांगते, ‘मी अभ्यास करतेय.’ हे ऐकून ती व्यक्ती आश्चर्य व्यक्त करत म्हणते, ‘तुझ्या शॉटसाठी जाण्याआधी अभ्यास करतेय का?’ त्यावर राशा सांगते, ‘माझ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. मी भूगोल वाचतेय.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 09-01-2025