रत्नागिरी : मिरजोळे येथे चोरट्यांनी क्लिनिक फोडले

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर परिसरात मंगळवारी रात्री एका क्लिनिकमध्ये चोरट्यांनी घुसखोरी केली. येथे चोरट्यांनी क्लिनिकचे कुलूप तोडून आतील कपाटही फोडले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही न लागल्याने ते पसार झाले. एकूण ४ चोरटे त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहर परिसरात ठिकठिकाणी चोरट्यांचा उच्छाद सुरु आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांसह रात्रीच्या वेळीही बंद घरांवर चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. मात्र या बाबत पोलिसांकडे गुन्हे दाखल होवूनही अजूनही चोरट्यांचा उच्छाद थांबलेला नाही. मंगळवारी रात्री मिरजोळे हनुमाननगर येथील वस्तीत एका क्लिनिकमध्ये घरफोडी करण्यात आली. चोरट्यांनी बंद क्लिनिकचे ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील कपाट व त्याचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त केले. त्यावेळी कोणताही किंमती ऐवज चोरट्यांच्या हाती लागलेला नाही. ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली. त्या बाबत पोलिसांनाही खबर देण्यात आली. घडल्या प्रकाराविषयी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात चार चोरटे घराच्या आवारात वावरताना दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 09-01-2025