खेड : देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचाही आधार घेतला आहे.
पर्यावरण सेवा योजनेबाबत पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात वारकरी मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेविषयक गजर केला.
सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने. जनजागृतीवर विशेष भर देताना शाळा, महाविद्यालयांतही जनजागृती मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. पर्यावरणाचे संतुलन किती महत्वाचे आहे. हे पथनाट्याद्वारे पटवून देण्यात आले. ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 09/Jan/2025












