वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे टाळण्याचे आवाहन

संगमेश्वर : तारुण्यात मोबाईलद्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या वापरामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर तरुण मुला-मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना आपली वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचे टाळावे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते, असे संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी सांगितले.

संगमेश्वर, लोवले येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वसंरक्षण आणि सायबर गुन्हेगारीबाबत विशेष मार्गदर्शन उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, पोलिस बाबुराव खोंदल, कुणाल घोलप, होमगार्ड अभिषेक झेपले, प्राध्यापक प्रशांत जाधव, प्रा. स्नेहल खेराडे, नेहा सरवणकर आदी उपस्थित होते. त्यांनी पोलिस वापरत असलेल्या विविध शस्त्रांविषयी माहिती दिली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:36 09-01-2025