रत्नागिरी : तालुक्यातील रिळ भंडारवाडी येथील बंद घर फोडून अज्ञाताने रोख २५ हजार रुपये लांबवले. चोरीची ही घटना मंगळवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते बुधवार ८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वा. कालावधीत घडली आहे. अमर चव्हाण (६७, रा. रिळ भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अमर चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते. त्या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून लाकडी दरवाजाचे चौकडीला लॅचची असलेली कडी कोणत्यातरी हत्याराचे उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा हत्याराने उचकटून कपाटाच्या लॉकरमधील रोख २५ हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 10/Jan/2025












