चिपळूण सरपंच संघटनेतर्फे बीडमधील हत्याप्रकरणाचा निषेध

चिपळूण : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या वतीने गुरूवारी जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेतील मुख्य सूत्रधार व मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन करण्यात आले व श्रद्धांजली वाहून येथील प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, उपाध्यक्ष सुहास भागडे, निता शिंदे, सचिव विलास गमरे, सहसचिव सदानंद पवार तसेच सरपंच सुदेश गमरे, नरेश घोले, चंद्रकांत तांडकर, शशिकांत राऊत, प्रमोद डिके, दिनेश पुनवत, महेश शिर्के, सुनील वाजे, रोहन महाडिक, पूजा कदम, नेहा वाजे, जिया कदम, नम्रता मोहिते, संचिता जाधव, श्रावणी मोहिते व तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, संघटनेतर्फे अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. तसेच यावेळी संघटनेतर्फे घटनेचा निषेध करून यापुढे अशी घटना घडू नये म्हणून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 10/Jan/2025