लांजा : खेरवसेत बिबट्याच्या हल्ल्यात गाय, बैल ठार

लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे गावामध्ये गेली आठ दिवस बिबट्याची दहशत सुरू असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक गाय ठार झाली झाली. यामुळे दोन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खेरवसे गावा शेजारील असणारे आसगे गावामध्ये महिनाभरापूर्वी बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. पाळीव प्राणी फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर बिबट्याने खेरवसे गावाकडे आपला मोर्चा वळवला असून, रात्री-अपरात्री बिबट्या लोकवस्तीत नागरिकांच्या नजरेस पडत आहे. गेली आठ दिवस बिबट्याने दहशत निर्माण केली असून, चार दिवसात बिबट्याने एक बैल व एक गाय ठार केली. मोकाट असणाऱ्या पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करत आहे. खेरवसे बौद्धवाडी, गुराववडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. गावात बिबट्याच्या मुक्त संचाराने भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 10/Jan/2025