रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूलमध्ये कॉपीमुक्त परिक्षेची शपथ

रत्नागिरी : शहरातील मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि निकोप वातावरणात परीक्षा देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शपथग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब न करण्याची व नीतिमूल्यांचे पालन करून परीक्षेचा सन्मान राखण्याची शपथ घेतली. हा कार्यक्रम प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका संजीदा म्हसकर आणि मुनव्वर तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. मुख्याध्यापक महंमदझुबेर गडकरी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 10/Jan/2025