खेड : मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भोसले राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सुरत येथील उद्योजक सदानंदराव विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी ही निवड जाहीर केली. रत्नागिरी जिल्हा नवीन निवडी जाहीर करण्यात येणार असून चंद्रकांत मोरे यांची खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्तीनंतर तालुक्यात नवसंजीवनी प्राप्त होईल. अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 11/Jan/2025













