चिपळूण : रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त सायकल प्रेमींसाठी १२ जानेवारी रोजी चिपळुणमधील माधव सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हास्तरीय ‘रत्न-सिंधु सायकल संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा सायकल संमेलनाचे हे चौथे वर्ष असून यंदा चिपळूण सायकलिंग क्लबकडे याचे यजमानपद आहे. सकाळी १० वाजता आमदार शेखर निकम
यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या संमेलनामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलप्रेमींसाठी स्नेहभोजनासोबतच सायकलिंगमध्ये नानाविध स्तरावर विक्रमी कामगिरी बजावलेल्या नामांकित सायकलिस्ट सोबत हितगुज साधण्याची संधीदेखील मिळणार आहे.
त्याचसोबत सायकल गौरव पुरस्कार वितरण, सायकलिंगसाठी योग्य पोषण, शारीरिक क्षमता, सुयोग्य ट्रेनिंग इत्यादी अत्यावश्यक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, सायकल क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या सायकलपटूंचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी या संमेलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबमार्फत करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 11/Jan/2025













