मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आज रत्नागिरीत

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरी सोमवार, दि. १३ रोजी दौऱ्यावर येत आहेत. ते रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराला भेट देऊन पाहणी करण्याचीही शक्यता आहे. या दौऱ्यात ना. नितेश राणे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.

आंबा, काजूप्रमाणे मत्स्यव्यवसाय सुद्धा जिल्ह्यातील मोठा उद्योग आहे. या दोन्ही उद्योगांवर रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारणही अवलंबून आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्या या दौऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला काय फायदा होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराला भेट देण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजता ना. राणे शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत. त्या नंतर दुपारी ३ मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाची आढावा बैठक घेणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 13/Jan/2025

Radhakrushna patapedhi