रत्नागिरी : पोमेंडीतील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याबाबत खा. नारायण राणे यांना निवेदन

रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथील (काजरघाटी) येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्याच्यादृष्टीने त्वरित लक्ष घालतो, असे आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी शिष्टमंडळाला दिले.

गावातील गिरीधर पटवर्धन, लीलाधर भडकमकर आणि ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांची रत्नागिरीत भेट घेतली. त्या वेळी पोमेंडी खुर्द येथे गेली सहा वर्षे सीआरझेड मंजुरीअभावी ७ कोटी रुपयांचा रखडलेला धूपप्रतिबंधक बंधारा व राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणामार्फत ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर झालेला बंधारा या कामांना चालना मिळण्याबाबत खासदार राणे यांना सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली. हे दोन्ही बंधारे पूर्ण झाल्यास गावच्या सुमारे ३० एकर शेतीला फायदेशीर ठरणार आहे. त्या वेळी राणे यांनी त्वरित या विषयात लक्ष घालून काम सुरू होण्याच्यादृष्टीने लक्ष घालण्याचा शब्द दिला.

या वेळी रत्नागिरी जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व तालुकाध्यक्ष दादा दळी तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ व कामगार आघाडी प्रदेश पदाधिकारी भडकमकर यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 13/Jan/2025