रत्नागिरी : संगीत नाट्यक्षेत्रात खल्वायन हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे, ते त्यांच्या संगीत नाटयपरंपरा जपण्यासाठी त्यांनी दिलेल्या आजवरच्या भरीव योगदानामुळेच, आज एकाच संस्थेच्या तीन नाटकांचा संगीत नाट्य महोत्सव इथे रत्नागिरीत पहिल्यांदाच होतोय ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पुढच्या वर्षी सात संगीत नाटकांचा महोत्सव करावा, असे प्रतिपादन बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी केले.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात मुंबईतील एन. सी. पी. ए. आणि खल्वायन संस्था आयोजित संगीत नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, अ. भा. नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. सातव यांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलनाने झाले. खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी कीर्तनकार विशाखा भिडे, दीपक गद्रे, सागर चिवटे, अॅड. आशिष आठवले, गायक राजाभाऊ शेवेकर आदी उपस्थित होते.
महोत्सवात संगीत ताजमहाल, संगीत अमृतवेल आणि संगीत मत्स्यगंधा ही तीन नाटके अतिशय उत्तमरीशीने सादर झाली. कलाकारांनी रसिकांची वाहवा मिळवली. खल्वायनचे खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तसेच साखवळकर यांनी सुचवल्याप्रमाणे पुढच्या वर्षी खल्वायननिर्मित सात नाटकांचा महारशरण्याचा खल्वायन नक्कीच प्रयत्न करेल असे जाहीर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 16/Jan/2025
