खेड नगरपरिषदेची २४ थकबाकीदारांवर कारवाई

खेड : खेड नगरपरिषदेने थकित पाणीपट्टीधारकांविरोधातील कारवाईची मोहीम आणखी गतिमान केली आहे. बुधवारी २४ थकितदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

आठवडाभरात एकूण ४९ जणांना दणका देण्यात आला आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील पाणी विभागाच्या पथकाने आठवडाभरापूर्वीच थकित पाणीपट्टीधारकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नगरपरिषदेच्या पाणी विभागातील उमेश रेपाळ, पाणीपुरवठा अभियंता अक्षय लोहार, प्रणित जाधव, राजेश खेडेकर, मुकेश पेवेकर, सुनील पिलदणकर, सुयोग शिर्के, निखिल यादव पथकांमार्फत आदींच्या थकितदारांच्या नळजोडण्या तोडण्यात येत आहेत. यापुढेही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 17/Jan/2025