Breaking : पौष महिना संपताच राजन साळवी मोठा निर्णय घेण्याची शक्यता

रत्नागिरी : पौष महिना संपताच कोकणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजन साळवी पुढील राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेऊ शकतात. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजन साळवी काय निर्णय घेणार याबाबत सध्या कोकणामध्ये बरीच चर्चा आहे. पक्षासोबत कायम राहणार का पक्षाला राम राम करणार याबद्दल प्रचंड चर्चा आहे. पक्षाच्या नेतृत्वाकडून न मिळणारा सपोर्ट साळवींच्या नाराजीला कारणीभूत ठरला आहे, ज्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करीत आहेत.

दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या मतदारसंघांमध्ये झाल्या. जिल्ह्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर साहेब लवकरच राजकीय निर्णय घ्या असा दबाव टाकलेला आहे. त्यामुळे साधारणपणे पौष महिना संपतात राजन साळवी पुढची जी राजकीय भूमिका आहे ती घेऊ शकतात. शक्यता जास्त हीच आहे की राजन साळवी हे जवळपास पक्षाला राम राम करण्याच्याच मनस्थितीमध्ये असू शकतात कारण की कार्यकर्ताचा दबाव देखील त्यांच्यावरती त्यासाठी वाढताना आपल्याला दिसून येतोय. राजन साळवी बीजेपी मध्ये जाणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेल्या आपल्याला पहावयास मिळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:32 AM 18/Jan/2025