लांजा तालुका टॅंकरमुक्त करणार : आमदार किरण सामंत

लांजा : भावनेला बाजूला ठेवून जनतेने विकासकामाला प्राधान्य दिले म्हणजेच विकासाला निवडून दिले. त्यामुळे लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघातील प्रलंबित आणि नवी विकासकामे मार्गी लावली जातील, ती जबाबदारी माझी आहे. यासह लांजा तालुका टॅंकरमुक्त करण्यावर भर देणार असून, तालुक्यात सुरू असणारी जलजीवन कामे पूर्ण होत आहेत, असे आमदार किरण सामंत यांनी वेरवली खुर्द येथील कार्यक्रमात सांगितले.

लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द राणेवाडी येथे सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, एस. एन. कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, लांजा तालुका संघटक प्रसाद माने, लांजा तालुका उपसंघटक चेतन खांदारे, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर,जगदीश राजापकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत वरवली खुर्द गाव गेली २० ते २५ वर्षे विकासकामांपासून दूर राहिला असल्याची नाराजी याप्रसंगी नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार सामंत म्हणाले, वेश्वली खुर्द गावातील प्रलंबित विकासकामे आहेत ती लवकरच मार्गो लावणार. पाणी, रस्ता, रेल्वेस्टेशनबाबत ज्या समस्या आहेत त्या वरिष्ठांपर्यंत चर्चा करून मार्गी लावल्या जातील.

भविष्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका येतील त्या मोठ्या ताकदीने जिंकू, याची खात्री आहे. विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप म्हणाले, आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामांसाठी मोठा निधी आणला जात आहे; मात्र पूवीं विकासाच्या नावाने जनतेमधून ओरड सुरू होती. त्यामुळे भविष्यात शैक्षणिक, आरोग्य, पाणी, वीज या जन मूलभूत सुविधांसह तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी हक्काचा आमदार मिळाला आहे. त्यामुळे मागील बॅकलॉग टप्प्याटप्प्याने भरून काढला जाणार आहे.

पक्ष संघटना बळकट करूया विकासकामे करता करता शिवसेना पक्ष संघटन मजबुतीकरणाचा संकल्प ठेवूया आणि आपला मतदारसंघ प्रगतीच्या दिशेने नेऊया, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 22/Jan/2025