टीआरपी येथील प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी : किरकोळ कारणातून गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रौढावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनिल संग्राम म्हस्के (४८, रा. आदित्यनगर टीआरपी, रत्नागिरी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने घरातील छताच्या फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो लटकत असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या गळ्यातील फास सोडवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 22-01-2025