बसणीतील नळपाणी कामासाठी खोदलेला चर ठरतोय अपघातांचे कारण

रत्नागिरी : आरे-वारे मार्गे गणपतीपुळे येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसणी हायस्कूलसमोरील नळपाणी योजनेसाठी खोदलेला चर सध्या अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी रस्त्यावर पडलेला खोल व मोठा चर वेळेत बुजवला न गेल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची ये-जा असते. मात्र, नळपाणी कामासाठी खोदलेल्या चरामुळे वाहनांना जोरदार धक्के बसत असून दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा अभाव असल्याने हा धोका अधिक वाढत आहे.

गणपतीपुळे या प्रमुख पर्यटनस्थळाकडे जाणारा हा मार्ग असल्याने पर्यटकांनाही याचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केली असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

तातडीने हा चर बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Lok. Tilak hospi.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 14-04-2026