रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करत सलोखा बिघडवल्याबद्दल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर भडकाऊ भाषणांवर प्रतिबंध करणारा कायदा लागू करण्यात यावा, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ता जमीला मर्चंट यांनी वकील एजाज मकबूल यांच्यावतीनं ही याचिका दाखल केली आहे.

13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच दाखल झालेल्या याचिकेत महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिीस आणि नितेश राणे यांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असतानाही, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

अलीकडेच रामगिरी महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यात एका विशिष्ट धर्माबद्दल दिलेल्या वक्तव्यानंतर हिंसा उसळली होती. नितेश राणे हे उघडपणे रामगिरी महाराजांचं समर्थन करत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलाय.

काय म्हणाले होते नितेश राणे?

फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांसोबतच त्यांच्या मित्रपक्षांकडूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्या आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 17-09-2024