लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत मूकबधिर विद्यालय रत्नागिरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

रत्नागिरी : मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग” दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत मूकबधिर विद्यालय, लक्ष्मी चौक गाडीतळ रत्नागिरी या ठिकाणी मूकबधिर शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब मार्फत करण्यात आले होते.

यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी मार्गदर्शन कार्यशाळा याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन तीन दिवस करण्यात आले होते.

शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 32 असून सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांना लायन्स क्लब मार्फत भेटवस्तू देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊचे नियोजन लायन्स क्लब मार्फत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती कोतवडे गावचे रहिवासी प्रदीप शिरगावकर व कुटुंबीय उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून खेळाच्या साहित्याचे किट विद्यार्थ्यांना प्रदान केले. या कार्यक्रमाला लायन्स क्लब अध्यक्ष ला गणेश धुरी, सचिव ला विशाल ढोकळे, माजी अध्यक्ष ला शिल्पा पानवलकर, ला संजय पटवर्धन उपस्थित होते, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रजपूत सर व अन्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक यांनी लायन्स अध्यक्ष व सर्व सभासदांचे मनापासून आभार मानले. अध्यक्ष गणेश धुरी यांनी संस्थेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Tata motars punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 03-12-2024