रत्नागिरीत आज आरोग्य जनजागृतीवर नाट्यस्पर्धा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि इंडियन मेडिकल असोसिएशन रत्नागिरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा शनिवारी (ता. २५) आयोजित केली आहे. सकाळी १० वाजता स्वा. वीर सावरकर नाट्यगृहात स्पर्धा होणार आहे. रत्नागिरीमधील विविध महाविद्यालये यात आरोग्य जागृतीवर नाटक सादर करणार आहेत.

हा उपक्रम विनामूल्य ठेवण्यात आला असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे. नाट्यस्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्य व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते होईल. या वेळी एचआयव्ही/एड्स जनजागृती, नेत्रदान जनजागृती, उच्च रक्तदाब व मधुमेह जनजागृती, रक्तदान जनजागृती, कुष्ठरोग जनजागृती, मानसिक आरोग्य जनजागृती, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम, कॅन्सर जनजागृती, क्षयरोग जनजागृती या विषयांवर आधारित नाटके सादर केली जाणार आहेत. स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या नाटकाला ८ हजार रुपये रोख, द्वितीय ५ हजार रोख, तृतीय ३ हजार रोख आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. आरोग्याच्या विविध मुद्दधांवर प्रकाश टाकण्यासाठी हा कार्यक्रम नागरिकांसाठी एक उत्तम संधी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 25/Jan/2025