रत्नागिरी : दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनचे सदस्य आणि आवाशी (ता. खेड ) ग्रामपंचायतीच्या सदस्या श्रद्ध आंब्रे यांनी दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.

सध्याची दिव्यांगांची असलेली पेन्शन दिव्यांगाना पुरेशी नाही ती दरमहा १,५०० रुपयांवरून ४,००० रुपये करावी आणि दिव्यांगांची पेन्शन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पेन्शन खात्यात जमा व्हावी, प्रत्येक आमदाराच्या दरवर्षीच्या आमदार निधीतून शासनाच्या जीआरप्रमाणे ५ टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करून दिव्यांगांना त्याचा लाभ द्यावा, दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या घरकुल निधीत १,२०,००० रुपयांवरून २,५०,००० रुपयांपर्यंत वाढ करावी, अशा मागण्या करण्यात आल्.ा.

या मागण्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडू असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले. यावेळी अरुण कदम (अण्णा कदम) ,शशिकांत चव्हाण, श्रद्धा आंब्रे आणि आवाशी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 25-01-2025