चिपळूण : गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना तसेच गोहत्या करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. कडक कारवाई होत नसल्याने सातत्याने या घटना घडत आहेत. चिपळूण तालुक्यात सावर्डे, मालदोलीसह कालुसते येथे कत्तलखाने सुरू आहेत. गोहत्या प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई होण्यासाठी येत्या अधिवेशनात जोरदार आवाज उठवणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूणातील गर्जना सभेत सांगितले.
काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात बेकायदा गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. त्यानंतर चिपळूण तालुक्यासह सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. यातूनच शहरातील शिक्षक संघटनेच्या सभागृहात आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत गोहत्या रोखण्यासाठी गर्जना सभेचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार राणे म्हणाले, गोहत्या झाल्यावर कितीवेळा आपण एकत्र जमणार. रत्नागिरीतही याबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्यानंतर संबंधितांवर त्वरित कारवाई झाली. विशिष्ट समाजाकडून या गोष्टींबाबी घडत आहेत. गुरांची तस्करी आणि हत्या याबाबत यामध्ये ठराविक लोकांचीच नावे सातत्याने पुढे येत आहेत. त्यांना कायद्याची कसलीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे दोन-चार महिन्यातून एकदा या घटना घडतात, त्यांना मोक्का लावायला हवा. यासाठी राज्य सरकारच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार आहे. या प्रकरणात पोलिसांची काही चूक नाही, ते सहकार्याच्या भूमिकेत आहेत. गो तस्करीत सहभागी होणाऱ्यांना वर्षभर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला जावा अशी तरतूद व्हायला हवी, तरच याबाबत संबंधितांना धाक बसेल. यापुढील सभा देखील कराड येथेच होईल. त्यावेळी देखील जिल्हावासीयांनी तेथे उपस्थिती लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 27/Jan/2025














