पद्म पुरस्काराच्या घोषणेनंतर गायक सोनू निगमने व्यक्त केली नाराजी…

Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (२५ जानेवारी २०२५ )केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2025) घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत.

यामध्ये संगित क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गोरवण्यात आलं आहे. संगीत क्षेत्रात मोठं योगदान दिल्याने अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर लोक गायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. गायक पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. पद्म पुरस्काराच्या घोषणेनंतर आता गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे.

सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि श्रेया घोषाल यांचा सन्मान न केल्याबद्दल सोनू निगमने पद्म पुरस्कार 2025 वर प्रश्न उपस्थित केला. “भारत आणि त्याचे प्रलंबित पद्म पुरस्कार प्राप्तकर्ते” असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला, असे दोन गायक ज्यांनी जगभरातील गायकांना प्रेरणा दिली आहे. त्यातील एका गायकाला फक्त पद्म श्री पुरस्कार दिला गेलाय. ते म्हणजे मोहम्मद रफी आणि दुसरे म्हणजे ज्यांना पद्मश्रीही मिळाला नाही ते म्हणजे किशोर कुमार”.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 27-01-2025