चिपळूण : कुळवंडी येथील ग्रामदैवत सुकाई मंदिर परिसराची सफाई

सावर्डे : येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भागशाळा खरवतेच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक उपक्रमांतर्गत कुळवंडी येथील ग्रामदैवत सुकाई मंदिर परिसराची स्वच्छता केली.

विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव व्हावी श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेमुळे सुंदर गाव स्वच्छ गाव ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात येईल. स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांना अंगी बनवता येतील या उद्देशाने विद्यालयाने हा उपक्रम राबवला. उपक्रमात अशोक पाटील, दादासाहेब पांढरे, प्रतीक घाग, संजय मेस्त्री, सौ. वैभवी भुवड, नागले व विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 28/Jan/2025