रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात दोन पादचारी महिला तसेच तिथे पार्क केलेल्या स्कॉर्पिओ गाडीला धडक देत अपघात केला.
अपघाताची ही घटना सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी १०.१५ वा. सुमारास ओरी फाटा येथे घडली. मकरंद महादेव कोयंडे (२७, रा. शिवडी कोळीवाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार विनोद भितळे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सोमवारी मकरंद कोयंडे आपल्या ताब्यातील टाटा नेक्सॉन कार (एमएच ०१-ईव्ही-९९९७) घेऊन गणपतीपुळे ते मुंबई असा भरधाव वेगाने जात होता. तो ओरी फाट्याजवळ आला असता त्याचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या उजव्या बाजुला जात मानसी कुळ्ये (४०) आणि प्रभावती सांबरे (५९, दोन्ही रा. धामणसे सांबरेवाडी, रत्नागिरी) या दोन पादचारी महिलांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडी (एमएच-०८-व्ही-९७९२) ला धडक देत अपघात केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 30/Jan/2025













