संगमेश्वर : छत्रपती संभाजी महाराजांचा कसब्यात ४ फेब्रुवारीला राज्याभिषेक दिन

संगमेश्वर : छत्रपती संभाजी- महाराजांचा ३४४ वा राज्याभिषेक दिन ४ फेब्रुवारीला आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन न सोहळा श्रीक्षेत्र कसबा येथे साजरा होणार आहे.

कसबा म्हणजे धर्मनगरी, त्रिनदी संगमावरील ज्या संगमेश्वर देवस्थानामुळे या स्थानाला संगमेश्वर ही ओळख प्राप्त झाली, त्याच कसब्यामध्ये शंभूराजे यांनी वास्तव्य केले होते. इथेच त्यांना बेसावधक्षणी पकडण्यात आले. याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वैचारिक पाऊल खुणांवर चालणारी पिढी समाजात घडावी, या एकमेव उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे नित्यपूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रयत्नातून निरंतर सुरू आहे.

४ फेब्रुवारीला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व श्री शिवशंभूपाईकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 30/Jan/2025