रत्नागिरी : महास्वयम् वेबपोर्टलद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे खासगी आस्थापनांना आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयम् वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या सभागृहात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावी आणि जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी त्यांना देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्डचा वापर करून रिक्त पदे ऑनलाइन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.

रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 19-02-2025