नवी दिल्ली : Budget 2025 | 1 फेब्रुवारी 2025 रोजी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल. तर 31 जानेवारी म्हणजे उद्यापासून बजेट सत्र सुरू होईल. सरकार यावेळी काय दिलासा देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे बजेट सत्र यावेळी दोन सत्रात असेल.
ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या काळात सरकार जवळपास 16 महत्त्वपूर्ण बिल सादर करण्याची शक्यता आहे.
31 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 पर्यंत दोन सत्रात बजेट सत्र असेल. पहिले सत्र हे 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर दुसरे सत्र हे 10 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे हे 8 वे बजेट आहे.
यामध्ये The Banking Laws (Amendment) Bill, 2024, The Railways (Amendment) Bill, 2024, The Disaster Management (Amendment) Bill, 2024, The Oilfields (Regulation and Development) Amendment Bill, 2024 ही बिल सादर होतील.
तर The Boilers Bill, 2024, The Readjustment of Representation of Scheduled Tribes in Assembly Constituencies of the State of Goa Bill, 2024, The Waqf (Amendment) Bill, 2024, The Mussalman Wakf (Repeal) Bill, 2024, The Bills of Lading Bill, 2024 ही महत्त्वाची बिलं पण सादर होतील.
The Finance Bill, 2025, The Immigration and Foreigners Bill, 2025, The Coastal Shipping Bill, 2024 या बिलाच्या माध्यमातून कायद्यात बदलाची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 30-01-2025
