चिपळूण : नगर विकास विभागातर्फे कोकण विभागस्तरीय (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर) आयोजित पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा संघाने चॅम्पियनशिप मिळवली. चिपळूण नगर परिषदेने जिल्ह्याचे नेतृत्व केले. या यशामुळे आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या क्रीडा रत्नागिरी येथे झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात चिपळूण नगर परिषदेने सर्वसाधारण जेतेपद पटकावले. त्यामुळे पनवेल येथे कोकण विभागीय महोत्सवासाठी नगर परिषदेला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. येथेही चमकदार कामगिरी केली आहे. पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे झालेल्या येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये (दुहेरी – प्रकारात) चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रवीण नाईक (एकेरी -प्रकारात) यांनी विजेते पद पटकावले. थाळीफेक (पुरुष ) आनंद बामणे विजेते, गोळा फेक (पुरुष ) आनंद बामणे उपविजेते, भालाफेक दत्तात्रय होला उपविजेते, रिले ४०० मीटर पुरुष गटात रोहित खाडे, अनिकेत सकपाळ, रत्नदीप कांबळे, सागर (मंडणगड) उपविजेते, कबड्डी (पुरुष) मध्ये महेश जाधव, अनिकेत सकपाळ रत्नदीप कांबळे- उपविजेते, हॉलीबॉल स्पर्धेत रत्नदीप कांबळे- तृतीय, क्रिकेट स्पर्धेत वैभव निवाते, दीपक किंजळकर, साहिल कांबळे- तृतीय, रांगोळी स्पर्धेत मंगेश नलावडे ( देवरुख)- विजेते, तर उपविजेते अमिषा पावसकर (खेड), धावणे १००/२००/४०० मीटर (महिला गटात)- निवेदिता आंबेकर विजेत्या, भाला फेक व थाळी फेक स्पर्धेत ( महिला गटात) सिद्धी खानविलकर ( खेड) यांनी उपविजेते तर तर गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांब उडी स्पर्धेत ( महिला गटात) सायली खेतले, निवेदिता आंबेकर, सायली खेतले, संतोषी चोगले, सिद्धी खानविलकर ( खेड ) यांनी विजेतेपद मिळवले.
तर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक नृत्य मध्ये राकेश बारये, प्रथम क्रमांक कृष्णल मोहिते, द्वितीय क्रमांक तर विठ्ठल- विठ्ठल सामूहिकक नृत्यांमध्ये रत्नागिरी प्रथम क्रमांक तर नगर परिषदेतर्फे श्रेष्ठ गावडे, श्रद्धा चव्हाण, सायली खेतले, शर्वा कांबळी, मनीषा खरात, अवंतिका खातू, कृष्णल मोहिते, हर्ष कांबळी यांनी सादर केलेल्या जोगवा फ्युजनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
तसेच वैयक्तिक गायन प्रकारात संतोषी चोगुले, मयुरी जाधव, राजक्रांती तांबे, निवेदिता आंबेकर, मुक्ता कोकाटे, सायली खेतले, सतीश गोरिवले, संकेत रामाने, राजेंद्र नवरत, ओंकार गोरीवले यांनी सादर केलेल्या शक्ती पोवाडा मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. प्रतीक्षा राजेशिर्के, सुरज सकपाळ, श्वेता सुर्वे, तुषार जाधव, संकेत मोहिते यांनी विशेष सहभाग घेताना माणूस म्हणून जगा ग बाई हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या स्पर्धेच्या यशस्वीते मध्ये मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरिक्षक महेश जाधव, सुजित जाधव, अकौंटन अवधूत बेद्रे, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, आनंद बामणे आदींनी विशेष प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 30-01-2025
