ब्रेकिंग : Union Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या महत्वाच्या घोषणा

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) आज(1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प मांडत आहेत.संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmal Sitharaman) यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अर्थसंकल्प (Budget 2025) वाचनाला सुरुवात केली आहे. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार आहेत. महिला शेतकऱ्यांकडे सरकारचं विशेष लक्ष असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. कृषी, लघू मध्य उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिन्स असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान महिलांसाठी अर्थसंकल्पात या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महिलांसाठी करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा

-दोन कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे.
-महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
– मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी ही योजना असून पाच लाख महिलांना योजनेचा लाभ होणार
– महिलांना स्टार्टअप साठी दोन कोटी रुपयांची मदत
– इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार
– सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना- आठ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार
– स्टार्टअप्ससाठी ₹10,000कोटींची तरतूद
• एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
— देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार (आकांक्षीत जिल्हे- aspirational district) ईशान्य भारतातही विशेष लक्ष

पोषण मुल्य पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवणार. 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार. सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन पुरवणार. भारतीय भाषा पुस्तक योजनेतंर्गत डिजिटल स्वरुपात शालेय आणि उच्च शिक्षणाची पुस्तकं स्थानिक भाषेत उपलब्ध करुन देणार.

अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी खास योजना
एससी,एसटीच्या पाच लाख महिलांना उद्योजक बनवणार
एससी,एसटीच्या महिलांना २ कोटींपर्यंतचं कर्ज देणार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 01-02-2025