Share Market Crash After Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात केलेल्या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावर पडला.
अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी उडी घेईल असे वाटले होते. मात्र राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजाराचे निर्देशांक अनुक्रमे 91.80 आणि 156.88 अंकांनी गडगडल्याचे दिसले.
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न यावेळी करमुक्त करण्यात आले आहे. सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या घोषणांनंतर शेअर बाजारात सकारात्मकता दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत घसरण झाली आहे. विशेष म्हणजे रेल्वे क्षेत्रातील, बँकिंग, आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
सेन्सेक्स निफ्टीमध्ये घसरण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात केलेल्या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावर पडला. अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी उडी घेईल असे वाटले होते. मात्र राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजाराचे निर्देशांक अनुक्रमे 91.80 आणि 156.88 अंकांनी गडगडल्याचे दिसले.
आयटी निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण
ताज्या आकडेवारीनुसार निफ्टी 50 निर्देशांक 23448.65 अंकांपर्यंत घसरला आहे. कालच्या तुलनेत ही -59.75 अंकांची घसरण झाली आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 137.88 अंकांनी घसरून 77362.69 अंकांवर आला आहे. बँक निफ्टीमध्येही 306.85 अंकांची घसरण झाली असून सध्या हा निर्देशांक 49280.35 अंकांवर आहे. आयटी कंपन्यांशी निगडित आयटी निफ्टीमध्येही 606.80 अंकांची घसरण झाली असून हा निर्देशांक 42055.95 अंकांपर्यंत खाली आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 01-02-2025














