खेड : तालुक्यात ११४ ग्रामपंचायती असून ८२ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. २० ग्रामसेवकांची पदे अद्यापही रिक्त आहेत. या ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार कार्यरत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. ३० कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी २० ग्रामपंचायतीतील पदे अद्यापही रिक्त असल्याने ग्रामस्थांच्या प्रशासकीय कामाचा खोळंबा होत आहे.
यापूर्वी तालुक्यातील २१४ गावातील ११२ ग्रामपंचायतींचा कारभार अवघ्या ६७ प्रामपंचायत अधिकाप्यांच्या हातात होता. या अधिकाऱ्यांना अतिरिक्त ग्रामपंचायती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, आता सात्विणगाव, मेटे, जामगे, केळणे, कावळे, कोरेगाव-मुंबके, सवेणी, साखर-सापिली, चिंचवली, घेरापालगड, निळीक, माणी, मोहाने, सवणस, धामणी, शिंगरी, कोतवली, तुळशी, खवटी, भिलारे आयनी, नातूनगर, आंबये, आंबवली, अस्तान, चोरवणे, शेरवल, हुंबरी, करोडी दिवाणखवटी, घेरापालगड जैतापूर, किंजळेतर्फे नातू आंबडस आदी ३० ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात रिक्त असणाऱ्या ग्रामपंचायतीतील पदे नेमकी कधी भरली जातील, याची हमी दस्तुरखुद पंचायत समिती देऊ शकत नाही. यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१०२ पैकी ८२ अधिकारी कार्यरत
तालुक्यात १०२ मंजूर पदे असतानाही सद्यः स्थितीत ८२ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यातील होडखाड-चौगुले मोहल्ला, भडगाव, भोस्ते, वेरळ, फुरूस, धामणंद, बोरघर, काडवली, सवणस खुर्द, वडगाव बुद्दक, किंजळेतर्फे नातू देवघर, सोनगाव, आवाशी, मुसाड, शिरगाव, कुरवळ जावळी, आंबडस आदी ग्रामपंचायतीत अद्यापही रिक्त आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीत हेलपाटे मारावे लागत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 03/Feb/2025














