सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 84 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एसीएक्सवर सोन्याचा दर 84252 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण, अमेरिका -चीन यांच्यातील व्यापार युद्धाची शक्यता, लग्नसराईच्या काळात देशातून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता यासारखी प्रमुख कारणं सोन्याच्या दरवाढी मागं आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा एप्रिलच्या वायद्याचा दर 84252 रुपयांवर पोहोचला आहे. सर्राफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर काल 85800 रुपये होता. ही माहिती अखिल भारतीय सर्राफा संघानं दिली होती.
1 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. म्हणजेच 4 जानेवारीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8240 रुपयांची वाढ झाली आहे. सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याच्या चांदीचा एक किलोचा दर 95826 रुपयांवर पोहोचला आहे.
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 86390 रुपये आहेत.चेन्नई, बंगळुरु, पुणे, हैदराबाद कोलकाता येथे सोन्याचा दर 86240 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 86290 रुपयांना 24 कॅरेट सोनं मिळतं. सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत सोन्याचा भाव 87 हजारांच्या पार गेला आहे. मागील 24 तासात एक हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. मुंबईत सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 87550 रुपयांवर आहे. मुंबईत सोन्याचा दर 8755 रुपये आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 05-02-2025














