संगमेश्वर : संगमेश्वर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे मंगळवारी (ता. ४) छत्रपती संभाजी महाराजांचा ३४४ वा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार नीलेश राणे हे उपस्थित होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले, तसेच आमदार नीलेश राणे यांनी पूजाअर्चा करत राज्याभिषेक दिन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वैचारिक पाऊलखुणांवर चालणारी पिढी समाजात घडावी समाजात जागृती व्हावी, या एकमेव उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे नित्यपूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या प्रयत्नातून निरंतर सुरू आहे. याच उद्देशाने मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला आमदार नीलेश राणे यांनी उपस्थित राहुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व संभाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
या सोहळ्याला गणेश गायकवाड, सिद्धेश चव्हाण, राजेंद्र महाडिक, रोहन बने, अभिजित शेट्ये, निखिल लोध, ओंकार लोध, साहिल सुर्वे, भगवतसिंह चुंडावत आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 06/Feb/2025














