चिपळूण : Chiplun तालुक्यातील तुरंबव येथील शारदादेवीच्या मंदिरात गुरुवारपासून (ता. ३ ऑक्टोबर) शारदोत्सव सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी देवीच्या रुप्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान देवीचे दर्शन व ओटी, साध्या नवसासोबत दररोज रात्री १०.३० वा. पारंपरिक जाखडी नृत्य नंतर भाविकांसाठी संततीविषयक नवस करणे आणि फेडण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कालावधीत मंदिर देवीच्या दर्शनासाठी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील. रात्री ९ वा. महाआरती व १०.३० वा. जाखडी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
नवरात्रोत्सवात एसटी महामंडळाने चिपळूण-तुरंबव, सावर्डे-तुरंबव अशा विशेष बसफेऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू केल्या असून, त्यांचे वेळापत्रक चिपळूण आगारात लावले आहे. या कार्यक्रमासाठी कोकण रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सावर्डे रेल्वेस्थानकात उत्तरावे लागेल. रेल्वेला सावर्डे येथे थांबा नसल्यास त्याने चिपळूण स्थानकात उतरून रस्त्याच्या मार्गाने तुरंबवपर्यंत प्रवास करावा लागेल. भाविकांना उत्तमरीतीने दर्शन व्हावे यासाठी मंदिर न्यासाने सर्वतोपरी नियोजन केल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 02/Oct/2024